निरंतर आनंदासाठी परस्पर नातेसंबंध महत्वाचे

आपल्या अंतर्मनातील आनंद हा कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, तो आपल्या मानसिक वृत्तीवर अवलंबून असतो; अस्सल आनंद आतून येत असतो. आनंदी राहण्यासाठी आपण सुज्ञपणे निवडत असलेल्या विविध बाबींवर ठरत असते. जेव्हा आपली बाह्य परिस्थिती चांगली असते, तेव्हा आपल्याला आनंद निवडणे सोपे होऊ शकते, परंतु ते त्याचे एकमेव कारण नसते. आपल्या सभोवतालच्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसल्या तरीही आपण आनंदी राहू शकतो. आनंद हा सर्वात महत्वाचा अनुभव असतो, आपण आपल्यावर प्रेम करतो, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, जे आपल्यावर मनापासून निरपेक्षपणे प्रेम करतात; त्यांतूनच खरा आनंद मिळत राहतो. आपण जे काही प्रयत्न, काम करत असतो, त्यात आपल्याला नेहमी आनंदी राहायचे असते आणि आपले आप्तेष्ट, मित्रपरिवार, सगेसोयरे, आपल्या सभोवतालचे लोक आनंदी असावेत, असेही वाटत असते. आपल्याला बरे वाटण्यापेक्षा आपल्यामुळे अनेकांना विविध कारणांसाठी आनंदी राहता यावे, असे काहीतरी करणे जरुरीचे असते, कारण प्रत्येकालाच आपापल्या जीवनात आनंदाची गरज असते.

काहीवेळा तणावपूर्ण नातेसंबंधांमुळे आपल्याला आनंद मिळतोच असे नाही, तरीही निरोगी वातावरण तसेच आश्वासक नातेसंबंध महान आणि चिरस्थायी आनंद देऊ शकतात. नातेसंबंध कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे, प्रियजनांसोबत वेळ घालवणे आणि इतर मार्गांनी हे नातेसंबंध जोपासणे आपल्याला आपल्या जीवनात आनंदाचे हे स्वरूप ठेवण्यास मदत करू शकते. इतरांना आनंदी करण्यापूर्वी स्वतःसोबत आपण आनंदी राहण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला आपली स्वतःची किंमत कळू शकते, आपले सामाजिक संबंध आणि सामाजिक स्थान समजून घेता येते, स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाच्या महत्वपूर्ण बाबी आपल्याला स्पष्ट होतात. नातेसंबंधांमुळे लोक त्यांच्या सहभागासाठी, आनंदासाठी, भागीदारांसाठी स्वतःहून खूप काही त्याग करतात, विशेषतः जेव्हा अशा व्यक्ती आधीच असुरक्षित असतात. आनंद ही कल्याण, आनंद किंवा समाधानाची भावना असते. जेव्हा लोक यशस्वी, सुरक्षित किंवा भाग्यवान असतात, तेव्हा त्यांना आनंद वाटत असतो.

प्रत्येक देश आणि त्या देशांतील प्रत्येक व्यक्ती “आनंदाचा पाठलाग” करत असते, त्यांचे आनंदी जीवन आणि त्यांचा उत्कर्ष यावर त्यांची प्रगति आधारित असते आणि वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या कारणांमुळे आनंद वाटत असतो. आपल्या आयुष्यातील उद्दिष्टांमध्ये आपापल्या जीवनातील मध्यवर्ती प्रेरणादायी उद्दिष्टे असतात, आपण सकाळी उठण्याची तीच खरी कारणे असतात. रोजच नवीन दिवस नव्या उद्दिष्टांनी सुरु करण्याचा आपल्या प्रत्येकाचा विचार आणि प्रयत्न असतो. आपले उद्देश आपापल्या जीवनाच्या निर्णयांना मार्गदर्शन करू शकतात, आपल्या वर्तनावर प्रभाव टाकू शकतात, ध्येये जीवनाला आकार देऊ शकतात, योग्य दिशा देण्याची भावना निर्माण करू शकतात आणि आपल्या जीवनाला एक विशिष्ट अर्थ निर्माण करू शकतात. काही व्यक्तींसाठी, उद्देश हा त्यांच्या व्यवसायाशी जोडलेला असतो अर्थपूर्ण, समाधानकारक काम करण्याशी तो संबंधित असतो. मूलतः आनंदाशिवाय, आपल्या जीवनात रंग किंवा हेतू नसतो. त्यामुळे जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकाला आनंदाची गरज असते. आयुष्यात, अशा अनेक गोष्टी घडतात ज्या आपल्याला खाली खेचण्याचा, आणण्याचा प्रयत्न करत असतात. तथापि, आपण आपल्या अंतरंगातील आनंद टिकवून ठेवल्यास, आपण त्यांच्यापेक्षा वर जाऊ शकतो, एक विशिष्ट उच्च पातळी आपण गाठू शकतो. प्रत्येकजण जगभर आनंदाच्या शोधात वेडा झालेला असतो. पण अनेकांना, अनेकदा त्याची जाणीव देखील होत नाही, ते कशाचा शोध घेत आहेत ह्याचा त्यांना साधा बोधही होत नाही, त्यामुळेच त्यांचा क्रोध वाढत जात असतो. मानसिक आरोग्यामध्ये आनंद, मन:शांती, जीवनातील आपल्या नातेसंबंधातील सदस्यांचा सहभाग आणि त्यामुळे आपल्यात निर्माण झालेला उत्साह यासारख्या सकारात्मक भावनांचा समावेश होत असतो. उत्पन्न, वैवाहिक स्थिती, शिक्षणाची पातळी, नोकरीतील समाधान, आरोग्य हे शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि ज्ञान वाढवणे ह्या दृष्टीने मानवी आनंदाचे प्रमुख प्रभावी घटक आहेत.

आपल्या बरोबरच आपल्या नातलगांच्या भावनांसह जीवनाचा प्रवास सहप्रवासी म्हणून करणे, स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक क्षणाला विलक्षण करणे म्हणजेच आपण खरोखर आनंदी असल्याचे लक्षण असते. कारण स्वतः कोण आहोत ह्याचा विचार न करता, इंतारांमधील दोष आणि सर्व दुर्गुण स्वीकारून त्यांना आपलेसे करणे हे त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरत असते. कारण अशा व्यक्तींना आनंद न मिळू देणे हा काही पर्याय होऊ शकत नाही, जेव्हा अशा व्यक्तींना आनंदी राहण्यास सांगितले जाते आणि ते आनंदी स्थिती प्राप्त करू शकत नाहीत (कारण ते वाईट परिस्थितीत असू शकतात, अथवा त्यांच्यात रासायनिक असंतुलन असण्याची शक्यता असते, काही व्यक्ती ज्या त्यांना सहसा आनंदी होऊ देत नाहीता, किंवा इतर कोणत्याही कारणास्तव), त्यांना अपयशासारखे, अपराध्यासारखे वाटत असते. एखाद्याला जे सत्य सापडते ते एक दुःखद सत्य असते, परंतु दुःखी सत्य हे आनंदी खोट्यापेक्षा श्रेयस्कर, योग्य ठरत असते. जेव्हा आपण आपल्या गरजेबद्दल प्रामाणिक असतो, तेव्हा आपला प्रत्येक प्रतिसाद आपल्याला मैत्रीचे सत्य, त्याची अमर्यादता तसेच त्याच्या मर्यादांकडे पाहण्यास भाग पाडत असतो.

सत्य आपल्यासाठी व्यक्ती म्हणून आणि संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचे असते. व्यक्ती म्हणून, सत्यवादी असण्याचा अर्थ असा आहे, की आपण आपल्या चुकांमधून शिकून मोठे आणि समंजस होऊ शकतो. समाजासाठी, सत्यता ही नेहमीच सामाजिक बंधने बनवत असते. खोटे बोलणे आणि दांभिकता असत्यतेमुळे आपली आपापसातील नाती तोडत असते. सत्य सांगणे महत्वाचे असते कारण ते प्रत्येकाला समजण्यास, पचवण्यास, मान्य करण्यास मदत करत असते. जेव्हा आपण आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करायच्या आणि त्या इतर व्यक्तींसोबत कशा शेअर करायच्या हे शिकतो, तेव्हा त्यामुळे त्या व्यक्तींबरोबर आपले जवळचे नाते निर्माण होत असते. कदाचित, आपण आपल्या महत्त्वाच्या, जवळच्या व्यक्तीशी खोटे बोलण्याचा निर्णय घेऊन, आपापसातील भांडण झाल्यानंतर आपण त्यांना नाराज नाही आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही तो खोटेपणा फार काळ लपून रहात नाही.

परंतू आपापसातील भांडणाचा प्रश्नच उद्भवू दिला नाही आणि केवळ सकारात्मक भावना मनात ठेवली तर सर्वांनाच आनंदाची प्रचीती प्राप्त होऊ शकते. जसे की आनंद, कृतज्ञता, समाधान, प्रेरणा आणि अभिमान हे सर्व जेव्हा आपण अनुभवतो, तेव्हाच त्या चांगल्या वाटत असतात. ह्या सर्व गोष्टी आपल्याला चांगले कार्य करण्यास, आपली धारणा विस्तृत करण्यास, आपली लवचिकता वाढवण्यास आणि आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. जे नातेसंबंधातील प्रत्येकाचे जीवन आनंदाने जगण्यायोग्य, सजग, सक्षम, समर्थ बनवते, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हा एक उद्देश असणे आवश्यक असते.

आनंद ही अशी गोष्ट आहे, जी आपण स्वतःसाठी निवडतो आणि आपल्या अस्तित्वानुसार आपले जीवन जगण्याचा मार्ग देखील आपणच निवडतो. जीवनातील घटनांचा आपण कसा अर्थ लावतो, यासोबतच आपली आंतरिक भावना आनंद निर्माण कशामुळे करते, हे समजून घेणे आवश्यक असते. आनंदाच्या अनेक भिन्न व्याख्या असल्या तरी, त्याचे वर्णन अनेकदा सकारात्मक भावना आणि जीवनातील समाधान म्हणून केले जाते. आपल्याकडे जे काही आहे, त्याबद्दल कृतज्ञ राहणे, वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्यावर काहीही आणि कोणतेही संकट आले, तरी सकारात्मक राहणे आवश्यक असते, कारण आपल्याला शेवटी आनंद प्राप्त करण्यात ते मदत करू शकते. आपल्या स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून नातेसंबंधातील प्रत्येक सदस्याच्या बाबतीत आपण ठेवलेला चांगला दृष्टीकोनच निश्चितपणे आनंद देते राहतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत